
कोल्हापूर: भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता संपन्न होताच भाजपा कोल्हापूरच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, चंद्रकांतदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ढोल-ताशाच्या ठेक्यावर नाचून आनंदोत्सव साजरा केला.कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना चंद्रकांतदादा पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरच्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होणार असल्याचा विश्वास माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, यापूर्वीच्या युती सरकार मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी महत्त्वाची खाती सांभाळत आपला कामाचा आवाका दाखवला आहे, गेले अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला समस्या, भ्रष्टाचार यामध्येच गुंतले होते. आज झालेल्या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील कॅबिनेट मंत्री झाले असून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी दादा कोल्हापूरचे पालकमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपा प्र.का सदस्य महेश जाधव म्हणाले, महाराष्ट्राला पुन्हा विकासाची गती देण्यासाठी हे सरकार सज्ज असून या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून राज्याला विकासाभिमुख सरकार लाभले आहे, त्यामुळे मागील अडीच वर्षाचा अधोगतीचा काळ संपून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले त्याच बरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री व्हावेत असा विश्वास व्यक्त केला.
भाजपा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, खानापूर सारख्या छोट्या गावातून आलेले आम. चंद्रकांतदादा पाटील यांनी दुसऱ्यांदा मंत्री मंडळ विस्तारामध्ये शपथ घेतली आहे. १३ वर्षे पूर्ण वेळ ABVP चे संघटनात्मक काम करून जनतेसमोर त्यांनी एक चांगले संघटन उभा करून दाखवले आहे. तसेच चंद्रकांतदादा नक्कीच पुन्हा एकदा कोल्हापूरचे पालकमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे.
यावेळी भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्रानी, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, विजय आगरवाल, भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष प्रदीप पंडे, सुधीर देसाई, विवेक कुलकर्णी, विजय खाडे-पाटील, दिग्विजय कालेकर, विशाल शिराळकर, अद्वैत सरनोबत, आप्पा लाड़, राजाराम परिठ, प्रताप देसाई, अवधूत भाटे, सुमित पारखे, हरशांक हरलीकर, विवेक वोरा, विश्वजीत पवार, अतुल चव्हाण, ओमकार खराडे, महेश यादव, संदीप कुंभार, दिलीप बोंद्रे, अरविंद वडगावकर, सुभाष माळी, रोहित कारंडे, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत, विद्या बनछोडे, चिनार गाताडे, विद्या बागडी, पूजा शिराळकर, प्रज्ञा मालंडकर, सुनिता सूर्यवंशी, संध्या तेली, राधिका तेली, स्वाती तेली, भारती आदुरकर, कविता सुतार, भाग्यश्री मोरे, छाया ननावरे ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.