Home News शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी शिवसेनेत क्रांती :राजेश क्षीरसागर

शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी शिवसेनेत क्रांती :राजेश क्षीरसागर

2 second read
0
0
16

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे धोरण, राज्याचा सर्वांगीण विकास आणि गेले अडीच वर्षे कॉंग्रेस – राष्ट्रवादी कडून शिवसैनिकांची होत असलेली गळचेपी मोडून शिवसैनिकांना न्याय देण्यासाठीच मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत क्रांती झाली असून, क्रांती दिनी या क्रांती रॅलीच्या माध्यमातून मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने पाठींबा दर्शविण्यात येत आहे. आगामी काळात ही क्रांतीची मशाल संपूर्ण जिल्ह्यात प्रज्वलित करून शिवसेना एकसंघपणे उभी करू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना – भाजप युतीचे स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने केले आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना राज्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा वाढता पाठींबा पहावयास मिळत असून, क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेच्या आज “दसरा चौक, कोल्हापूर” येथून क्रांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीच्या सुरवातीस जिल्ह्यातील दहा जेष्ठ शिवसैनिकांच्या वतीने क्रांती ज्योत प्रज्वलित करून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आली. या रॅलीस दसरा चौक येथून या दुचाकी रॅलीस सुरवात झाली. दसरा चौक मार्गे – अयोध्या टॉकीज, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, जोशी गल्ली कॉर्नर, शहीद भगतसिंग चौक, शिवालय कार्यालय, माळकर तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य स्वरूपात रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत भगवे ध्वज, हजारो दुचाकी आणि “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आगे बढो..” अशा घोषणांनी रॅली मार्ग दणाणून सोडला. या रॅलीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आज हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत युती केली नाही. २०१९ ला भाजप सोबत युती असतानाही अनपेक्षितपणे कॉंग्रेस -राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यात आली. पण, या अडीच वर्षात कॉंग्रेस – राष्ट्रवादी कडून शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्यात आले. शिवसेना संपविण्याचा डाव काहींनी केला होता पण याविरोधात मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी मोठे पाऊल उचलेले आणि शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी क्रांती केली. या निर्णयाचे स्वागत समस्त राज्यातील एकनिष्ठ शिवसैनिकांकडून होत आहे. ज्यांनी नेहमी शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला विरोध केला ते आम्हाला निष्ठा शिकवत आहेत. परंतु, खरे गद्दार कोण आहेत हे जनतेने उघड्या डोळ्याने पाहिले आहे. आमची क्रांती ही शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व, राज्याचा विकास आणि शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी असून, एकनिष्ठ शिवसैनिक आजच्या रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. हे भगवे वादळ संपूर्ण जिल्ह्यात घोंगावणार असून, येत्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेस गतवैभव मिळवून देण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या रॅलीत जेष्ठ शिवसैनिक माजी शहरप्रमुख बाळासाहेब घाटगे, देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, सुजित चव्हाण, जयवंत हारुगले, शिवाजी जाधव, मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, मा.नगरसेवक राहुल चव्हाण, मा.नगरसेवक अजित मोरे, मा.नगरसेवक राजू हुंबे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, महिला आघाडीच्या सौ.दिक्षा क्षीरसागर, मंगलताई साळोखे, पूजा भोर, ज्योती हंकारे, सपना शिंदे, सफल रेळेकर, अक्षता पोतदार, पूजा कामते, गीता भंडारी, गौरी माळतकर, शाहीन काझी, पूजा पाटील, रुपाली कवाळे, मंगलताई कुलकर्णी, सुनिता भोपळे, सोनाली साळोखे, रणजीत जाधव, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, सुनील खोत, दीपक चव्हाण, अमित चव्हाण, राजू पाटील, अश्विन शेळके, अंकुश निपाणीकर, तन्वीर बेपारी, योगेश चौगले, विश्वदीप साळोखे, पियुष चव्हाण, चेतन शिंदे, अविनाश कामते, शैलेश साळोखे, संजय संकपाळ, संग्राम पाटील, अशोक पाटील, अरुण सावंत आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…