
कोल्हापुरातील गजानन महाराज नगर येथे सुरू होणार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री डी . बी . पाटील फाउंडेशन सेंटर
कोल्हापूर : होतकरू , कष्टाळ विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सदैव झटणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी . बी . पाटील सर यांच्या कार्याच्या प्रेरणेतून • कोल्हापुरात गजानन महाराज नगर येथे फाउंडेशन सेंटर सुरू होत आहे . जेईई . नीट , सीईटी , आयआयटी एन डी ए . आणि ऑलिंपियाडस् सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आता अगदी शालेय जीवनापासूनच करता येणार आहे . डी बी पाटील सर यांच्या नावाने यावर्षी पासून स्कॉलरशिप सुरु करण्यात येणार आहे . यावर्षी इ . ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेऊन तालुकास्तरीय पहिल्या ३ क्रमांकाच्या विदयार्थ्यांना स्कॉलरशीप देण्यात येईल , इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ” ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री डी बी पाटील फाउंडेशन सेंटर ‘ तर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे .
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ कै . डी बी पाटील सर यांचे चिरंजीव श्री राजेंद्र पाटील व स्रुषा सौ सविता राजेंद्र पाटील यांच्यातर्फे हे सेंटर सुरु करण्यात येत असून शालेय विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सेंटर मार्फत करण्यात आले आहे . ज्यामध्ये विशेषतः फिजिक्स या विषयाचे मार्गदर्शन , अकरावी , बारावी , नीट व जेईईच्या विद्यार्थ्यांना , तज्ज्ञ शिक्षकांकडून दिले जाणार आहे . या सेंटरमध्ये उच्चशिक्षित अनुभवी प्राध्यापक वर्ग असून साप्ताहिक चाचणी तसेच वैयक्तिक मार्गदर्शन , नाविन्यपूर्ण डिजिटल शिक्षण मंच अशी या फाउंडेशनची वैशिष्ट्ये आहेत . या फौंडेशन मध्ये विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाचा पाया घातला जाईल , विश्वास त्यांचा आत्मविश्वास वाढेल , तयारी होईल असा विद्यार्थ्यांची बौद्धिक बौद्धिक विद्यार्थ्यांची फौंडेशन सेंटरच्या अध्यक्षा सौ सविता पाटील यांनी व्यक्त केला .