
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ८० सीसीटीव्ही
कोल्हापूर : सिक्युरिटी सोल्यूशन्स (जीएसएस) गोदरेज अँड बॉयसचे व्यावसायिक युनिट, गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने नुकतेच ‘’डिकोडिंग सेफ अँड साउंड – इन द इंडियन कॉन्टेक्स्ट’ (भारतीय संदर्भांत सुरक्षितता उलगडताना) हे सर्वेक्षण लाँच केले असून त्यामध्ये भारतीयांचा सुरक्षितता सुविधांकडे पाहाण्याची मानसिकता स्पष्ट करण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार ४२ टक्के नागरिक ‘सेफ अँड साउंड’ ही संकल्पना स्वतःच्या आणि प्रियजनांच्या आरोग्याबाबत लागू करतात.
या संकल्पनेशी सुसंगत राहात आणि सुरक्षेचे मूल्य जपत ब्रँडने यावर्षी महत्त्वाच्या सुरक्षा व्यवस्था कायम राखण्यात प्रमुख भूमिका बजावण्यासाठी कंपनीने देशातील सर्वात शुभ आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ८० सीसीटीव्ही बसवले. धार्मिक बाबींशिवाय कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर ऐतिहासिक स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. ७०० एडी चालुक्य साम्राज्यात बांधले गेलेले हे मंदिर पाहाण्यासाठी देशभरातील पर्यटक येतात.
याप्रसंगी गोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्सचे व्यवसाय प्रमुख श्री. पुष्कर गोखले म्हणाले, ‘देशाच्या विविध भागांत नवरात्रीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. हे लक्षात घेत जीएसएसने कोल्हापूरच्या प्रसिद्ध आणि पवित्र महालक्ष्मी मंदिरासाठी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. या उत्सवादरम्यान आपल्या लाडक्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी १.५ लाख भक्तगण मंदिराला भेट देतात. यानिमित्ताने मंदिर तसेच भक्तगणांना आणखी सुरक्षित ठेवण्याची गरज असल्याचे गोदरेज सिक्युरिटीज सोल्यूशन्सला वाटले. एकत्रितपणे आम्ही यंदाचा उत्सव अधिक सुरक्षित करू असा विश्वास आहे. महामारीच्या कठीण काळानंतर दोन वर्षांनी आपण नवरात्रीचा हा उत्सव सादरा करत असून मंदिरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही भक्तांना दर्शनाचा पुरेपूर आनंद देतील असा विश्वास आहे.’