
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना डिव्हिडंड वाटपाचा प्रारंभ झाला. बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, रणवीरसिंग गायकवाड, सुधीर देसाई या संचालकांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात संस्थांना हे वितरण झाले. बँकेशी संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १०, ३०६ संस्थांना दहा टक्केनुसार डिव्हिडंड वर्ग झालेला आहे.आमदार श्री. पाटील म्हणाले, महिन्यापूर्वी बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दिवाळीपूर्वी सहकारी संस्थांना दहा टक्के डिव्हिडंड देणार असल्याची घोषणा केली होती. त्या शब्दाची ही वचनपूर्ती आहे.