
चंदगड : बोनस मागणीचा निर्णय न झाल्याने कामगारांच्यातच मारहाण होत कारखान्यावर दगडफेक झाली कामगारांच्या संपातील काही कामे मार्गी लावल्यानंतर दोन पगार बोनस म्हणून मिळावे अशी मागणी केली होती निर्णय झाल्याशिवाय कामावर येणारे सक्ती करू नका अशी मागणी प्रशासनाकडे केली होती परंतु नोटीस पाठवल्यानंतर काही कामगार हजर झाले होते उरलेले काही कामगार गेले असता गेट बंद करून घेतले या रागातूनच त्यांनी गेट ढकलून दगडफेक केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तणावपूर्ण वातावरण निवळले. यानंतर पोलिसांनी व तहसीलदारांनी मध्यस्थी करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही.