
सरकारच्या मदतीशिवाय थेट पाईपलाईनचे काम पूर्ण करू : आ.सतेज पाटील
कोल्हापूर : पाऊस लांबला नसता तर थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झालं असतं. राहिलेलं कामही पूर्ण करू, सरकार म्हणून ते मदत करणार असतील तर काही अडचण नाही, पण आता फार मदत लागेल अशी परिस्थिती नाही. काम थांबल्यास मी सुद्धा त्यांना सांगेन, असे आ. सतेज पाटील महापालिकेतील आढावा बैठकीत सांगितले.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शहराची अवस्था विदारक झाली आहे. महापालिकेतील अभियंत्याच्या आईचाही खड्ड्यामुळे अपघाती मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब आहे. लोकप्रतिनिधी नसणे हे शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीने घातक आहे. महापालिका निवडणुका न झाल्याचा परिणाम विकासकामांवर दिसत असल्याचे सांगून त्यांनी राज्य सरकारने देखील यासाठी अजून निधी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.