
भारत जोडो नही भारत तोडो यात्रा है : शायना एन. सी.
कोल्हापूर : भारत जोडो नही भारत तोडो यात्रा है असे म्हणत भाजपच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेची टर उडवली. बरेच जण काँग्रेस सोडून जात आहेत. काँग्रेस पक्षाची नावच बुडत आहे. असे असताना ते देश काय जोडणार? कोणतीही वैचारिक विकास व दृष्टिकोन नसलेली ही यात्रा असून भाजपच्या 11 कोटी सभासदांच्या मानाने या यात्रेला मिळणारा काही हजारांचा प्रतिसाद नगण्य आहे. असे भाजप प्रवक्त्या शयना एन.सी. यांनी सांगितले. जॉयन्ट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या कोल्हापुरात आल्या होत्या.
जॉयन्ट्सचे सामाजिक काम चांगल्या पद्धतीने आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी सुरू आहे. झोपडपट्टीतील मुलांचे, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासाठी सुरू असलेल्या कामासाठी केंद्रातील भाजप सरकारचे सहकार्य मिळत आहे.
उद्योग गुजरातला जात असल्याबद्दल विचारले असता त्यांनी उद्योग कोठे करायचे हे सरकार नाही तर उद्योजक ठरवतात, तसेच नोटांवरील राष्ट्रीय नेत्यांच्या फोटोबद्दल त्यांनी तीव्र नापासंती व्यक्त केली. हे केवळ मतांच्या राजकारणासाठी चाललेले असून त्याला माझा पूर्ण विरोध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी जॉयन्ट्सचे गिरीश चितळे, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.