Home Info दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना प्रथम स्मृतिदिनी आदरांजली

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना प्रथम स्मृतिदिनी आदरांजली

0 second read
0
0
23

कोल्हापूर : शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे, शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचा प्रथम स्मृतीदिन विविध उपक्रमानी साजरा केला. त्यांचा प्रथम स्मृतिदिन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जाण्याने कोल्हापूरचे एक यशस्वी उद्योजक, उत्कृष्ट फुटबॉलपटू, अभ्यासू राजकीय नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
अण्णांच्या निधनामुळे विधानसभेतील सहकारी व मार्गदर्शक हरपला असून त्यांची उणीव सातत्याने जाणवते असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर शहराचे विकासाचे व्हिजन असलेले दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांची क्षणोक्षणी आठवण येत असल्याचे आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.
यावेळी अनिल घाडगे, माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी आण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी आमदार जयश्री जाधव, युवा उद्योजक व गोशिमाचे संचालक सत्यजित जाधव, प्रेमला जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, अस्मिता मोरे यांच्यासह सर्व जाधव कुटुंबीय आण्णांना अभिवादन केले.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार व गोकुळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, विनायक फाळके, राजेश लाटकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शाहीर राजू राऊत, कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, गोशीमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, मोहन मुल्हेरकर, सचिन शिरगावकर, अजित आजरी, उदय दुधाने, साजिद हुदली, संजय पाटील, आनंद माने स्मॅकचे अतुल पाटील, सचिन पाटील, अनुप पाटील, दीपक जाधव, भरत जाधव, शिवराज जगदाळे, पोपटराव जगदाळे, दुर्गेश लिग्रंस, आनंद माने, अजित कोठारी, बाबा जांभळे, किशोर कदम, संजय पाटील, देवेंद्र दिवाण, मोहन कुशीरे, पियुष पुंतार, धनंजय दुगे, मोहन पंडितराव, जिल्हा बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, अॅड. शाहू काटकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मावळा ग्रुपचे उमेश पवार, विज्ञान मुंडे, कमलाकर जगदाळे सुनील मोदी, उदय फाळके, राजू कांबळे, राहुल माने, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, तौफिक मुलाणी, विक्रम जरग, रामाने साहेब, सोहम शिरसगावकर, सुभाष बुचडे, ईश्वर परमान, यशवंत थोरात, श्रावण फडतरे, संजय पडवळे, शेखर पवार, अमित कदम, समीर कुलकर्णी, प्रकाश नाईकनवरे, राहुल माने, काका पाटील, विनायक फाळके, संपत पाटील, आजी उपमहापौर संजय मोहिते, नेत्रदीप सरनोबत, विजय पाटील, मयूर पाटील, विलास वास्कर यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहराच्या विविध भागात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, योग शिबीर, कोल्हापूर थाळी, कुष्टधाम हॉस्पीटल येथे अन्नदान, पांजरपोळ येथे चारा वाटप असे विविध उपक्रम दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त राबवण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Info

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…