Home Entertainment तरुणाईला भुरळ घालणारा ‘एकदम कडक’ चित्रपट 2 डिसेंबरला

तरुणाईला भुरळ घालणारा ‘एकदम कडक’ चित्रपट 2 डिसेंबरला

0 second read
0
0
59

तरुणाईला भुरळ घालणारा ‘एकदम कडक’ चित्रपट 2 डिसेंबरला

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविले जातात. त्यातील काही चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते. दरम्यान या चित्रपटामधील आकर्षक सीन प्रेक्षकांचं लक्ष विशेष वेधून घेतलं होतं. या आकर्षक चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाच एंट्री झाली आहे. या धाटणीच्या अंतर्गत येणारा आणि तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमँटिक, संघर्षमय, आशयघन असा ‘एकदम कडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत आणि ‘शुभम फिल्म प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या एकदम कडक’ या चित्रपटात अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने हे कलाकार पडद्यावर धुडगूस घालायला सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टिझर, ट्रेलर आणि नृत्यांगना मानसी नाईकच्या ‘मॅडम कडक हा ‘ या गाण्यावरील दिलखेचक अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळच घातला आहे.

आकर्षक आणि आशयघन अशा या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात एकदम कडक नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे येत्या २ डिसेंबरला सिनेमागृहात पाहणे रंजक ठरेलच. ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत आणि ‘शुभम फिल्म प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व.नरेंद्र भिडे, पंकज पडघन आणि उमेश गवळी यांनी सांभाळली आहे. तर सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी सुरबद्ध केली आहेत. तर चित्रपटातील गीत मंगेश कांगणे यांचे आहे. संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर चित्रपटाच्या संकलनाची बाजू जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे. आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.

‘एकदम कडक’ चित्रपटाचे पोस्टर, टिझर, ट्रेलर आणि गाणी पाहता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच लागून राहिली असेल यांत शंकाच नाही, आता प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाण्यासाठी येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Entertainment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…