
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या राजेश क्षीरसागर यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या समाजकार्यास कोल्हापूर वासियांनी मोलाची साथ दिली आहे. त्याचपद्धतीने राजेश क्षीरसागर यांनीही कोल्हापूरच्या विकासासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या कोल्हापूरवासियांवरील प्रेमाचा दाखला देते. त्यामुळे कोल्हापूर आणि राजेश क्षीरसागर हे कधीही तुटणार अतूट नात असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्व आणि जनसामान्यांच्या कार्याचा वसा जपणाऱ्या राजेश क्षीरसागर यांच्या कार्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसह आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असल्याचे गौरोवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांनी केले. राज्य आयोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित होते.
यावर्षी शिवसैनिकांच्या उत्साहाने आणि जल्लोषी वातावरणात आपल्या लाडक्या नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केले. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी राजकारणापेक्षा समाजकार्याला अधिक महत्त्व देत शहरात विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह कुटुंबीयांनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर, स्नुषा सौ.दिशा क्षीरसागर, चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर, नातू कु.कृष्णराज आणि कु.आदिराज सोबत होते.