
सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ह्र्दरोग विभागात ‘फिलिप्स अझोरियन मोस्ट ऍडव्हान्स कॅथलॅब’ दाखल
मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व शस्त्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
कोल्हापूर : “ह्रदयरोग रुग्णांना अत्यंत कमी त्रासात अत्याधुनिक उपचार मोफत मिळणारे एकमेव केंद्र म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलचा लौकिक येणाऱ्या काळात होईल.” असे प्रतिपादन सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ह्र्दरोग विभागात दाखल झालेल्या अत्याधुनिक *‘फिलिप्स अझोरियन मोस्ट ऍडव्हान्स कॅथलॅब’* मशिनच्या पूजना प्रसंगी केले. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, “ आजच्या स्पर्धेच्या युगात रुग्णालय क्षेत्रात हि स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे रुग्ण बनवण्याची पद्धत रूढ होत असून अनावश्यक रुग्णालयात रुग्ण भरती वाढत आहेत. अशा स्पर्धेच्या काळात रुग्णांना खात्रीशीर व योग्य उपचार मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि याच अनुषंगाने सिद्धगिरी हॉस्पिटल आपल्या विविध विभागात नवनवीन तंत्रज्ञान रुग्णांसाठी उपलब्ध करत आहे. रुग्णांना मोठ्या शहरात मिळणारे अत्याधुनिक उपचार आता सिद्धगिरी सारख्या ग्रामीण भागातील रुग्णांना हि मिळत आहे हि आशादायक बाब आहे. सिद्धगिरी रुग्णाल कॅशलेस करण्याचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून ह्रदयरोग रुग्णासाठी मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व शस्त्रक्रिया करताना या आधुनिक मशीनद्वारे ते अधिक हनिविरहित करण्यास मदत होणार आहे.”
यावेळी या मशीनची माहिती देताना सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले, “ सदर *‘फिलिप्स अझोरियन मोस्ट ऍडव्हान्स कॅथलॅब’* मशीन हे मुंबई ते बेंगळूर आदी परिक्षेत्रातील ट्रस्ट श्रेणीतील पहिल्यांदा अशी सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करणारे सिद्धगिरी हॉस्पिटल हे पहिले रुग्णालय आहे. या मशीनद्वारे केवळ हृदयरुग्णच नव्हे तर मेंदूच्या शस्त्रक्रीयेसोबतच जिथे जिथे शिरे द्वारे रक्तपुरवठा केला जातो त्या शरीतातील भागातील उपचार करणे अधिक सुखकर होणार आहे. या मशीनमुळे इतर मशिनच्या तुलनेत ६०% पर्येंत रेडीएशनचा धोका कमी आहे. तसेच या मशीनद्वारे अँजिओग्राफी करताना पुढील उपचाराची दिशा तात्काळ अधिक सुस्पष्ट होणार आहे. त्यामुळे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा गरजू रुग्णांना नक्कीच होणार आहे.”
यावेळी विश्वस्त श्री.उदय सावंत म्हणाले, “रुग्णालय निर्माण करतना ग्रामीण भागातील लोकांना जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आधुनिक रुग्णसेवा मोफत व माफक मिळाव्यात हा मुख्य उद्देश होता. हृदयरोग रुग्णासाठी मोफत सेवा देवून रुग्णालयाचे वाटचाल त्यादिशेने सुरु आहे हि आशादायक गोष्ट आहे. सिद्धगिरी रुग्णालय हे रुग्णसेवेतील एक मानदंड होईल.”
गेली १२ वर्ष अविरत सेवा देणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेत अत्याधुनिक ‘फिलिप्स अझोरियन मोस्ट ऍडव्हान्स कॅथलॅब’ मशीन ह्रदयरोग विभागात दाखल झाले असून ह्रदयरुग्णांना सिद्धगिरी हॉस्पिटल म्हणजे एक नवसंजीवनी ठरले आहे अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. यापूजन सोहळ्यासाठी उद्योजक सुरेंद्र जैन, डॉ.श्रीकांत कोले, डॉ.रमेश माळकर,डॉ. अभिजित शेळके, डॉ.शंतनू पालकर, डॉ.प्रकाश भरमगौडर,डॉ.वर्षा पाटील, डॉ. सौरभ भिरूड, डॉ.तनिष पाटील, डॉ.अविष्कार कढव, डॉ.समीर तौकारी,डॉ. सचिन पाटील, डॉ.आशिष महामुनी, डॉ.वैशाली सावंत, श्री.वडड,श्री.बारामतीकर यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व सिद्धगिरी हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता.