Home News श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ परिवाराकडून अभिवादन

श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ परिवाराकडून अभिवादन

4 second read
0
0
6

कोल्हापूर : श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्मदिनानिमित्त गोकुळतर्फे अभिवादन करण्यात आले व हा दिवस राष्‍ट्रीय दुग्ध दिवस म्‍हणून साजरा केला जातो. गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांच्या हस्ते डॉ. वर्गीस कुरियन यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून त्यांना जिल्ह्यातील दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुंबई येथे झालेल्‍या २६/११ च्‍या दहशतवादी हल्‍यातील वीरमरण पावलेल्‍या शुर विरांना गोकुळ परिवाराकडून आदरांजली वाहण्‍यात आली.

यावेळी बोलताना जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे म्‍हाणाले कि स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांनी नेहमीच सहकारातील संस्था मजबुतीकरणावर भर दिला. संस्थेचा आर्थिक पाया भक्कम असल्याशिवाय दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ करून देता येणे शक्य नाही.याकरीता त्यांनी नेहमीच गोकुळसारख्या संस्थांना मार्गदर्शन केले.असे मनोगत व्‍यक्‍त केले.

याप्रसंगी संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, चेतन नरके, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्ही तुरंबेकर, पशुसंवर्धन सहा.व्‍यवस्‍थापक डॉ.प्रकाश दळवी,जनसपंर्क अधिकारी सचिन पाटील व संघाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…