
‘सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये एम.आर.आय. व फिलिप्स अझ्युरीऑन मशीन लोकार्पण सोहळा
कोल्हापूर : ‘सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये रोगावरील अचूक निदानासाठी अत्याधुनिक एम.आर.आय. व फिलिप्स अझ्युरीऑन मशीन हे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रांगणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, तरी नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी केले.
एम.आर.आय. मशीनद्वारे स्पेक्ट्रोस्कोपी, ३ डी ट्रक्ट्रोग्राफी तसेच लहान मुलांच्या व प्रौढांच्या पूर्ण शरीराच्या स्कॅनिंग अतिशय वेगवान होणार असून अचूक निदान करण्यास त्याची मदत होणार आहे. एम.आर.आय.सेवा ‘ना नफा ना तोटा’ या तत्वानुसार ४० टक्के कमी दरात २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक अचूकपणे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, लहान मुलांच्यातील रोग निदान व उपचार, इलेक्ट्रोफ़िजिओलॉजी, पेस मेकर, मेंदूतील रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग निदान व उपचार, तसेच शरीरातील रक्तवाहिन्यांच्या संबंधी निदान व उपचार करण्यास सहाय्यता होणार असल्याचे डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी सांगितले.
‘सिद्धगिरी मठ येथे फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या ‘सुमंगलम’ महोत्सवाचे कोल्हापूर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन १५ जानेवारी २३ रोजी सायं ५ वाजता चंद्रकांत पाटील व काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या उपस्थितीत होणार असल्याचे डॉ.संदीप पाटील यांनी सांगितले.