
कोल्हापूर : लॉमेन या केवल किरण क्लोथिंग लिमिटेडच्या (केकेसीएल) अधिपत्याखालील प्रतिष्ठित मेन्स अफोर्डेबल लक्झरी फॅशन ब्रँडने विस्तारीकरण करत कोल्हापूर शहरामध्ये आपल्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन केले. या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतूराज पाटील आणि कोल्हापूर उत्तरच्या आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव उपस्थित होते. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आणखी ५० आऊटलेट्स लाँच करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील फॅशनप्रेमी पुरूषांच्या स्मार्ट, स्टायलिश व आरामदायी पोषाख परिधान करण्याप्रती वाढत्या गरजेची पूर्तता करण्यासाठी लॉमेनने झपाट्याने विस्तार करण्याची योजना आखली आहे.
सर्वात मोठ्या व सर्वोत्तम मेन्स फॅशन स्टोअरसह शहरामध्ये प्रवेश करत लॉमेनचा ट्रेण्डी आणि इन-वोग कलेक्शन्स सादर करण्याचा मनसुबा आहे. ७०० चौरस फूटांवर पसरलेले कोल्हापूर येथील राजारामपुरी चौथी गल्ली, मेन रोड येथे लॉमेनचे स्टोअर दर्जात्मक ट्रेडिंग डिझाइन्स आणि आधुनिक फॅब्रिक्स देते, ज्यामुळे पुरूषांच्या कॅज्चुअल व वर्क वेअरसाठी दर्जा वाढतो. प्रत्येक ग्राहकासाठी अनुकूल पोशाख असण्यासह स्टोअर परिपूर्ण वॉर्डरोब सोल्यूशन देते, ज्यामध्ये ग्राहकांसाठी दिवस व रात्रीसाठी आवश्यक असलेल्या फॅशनेबल पोशाखांचा समावेश आहे. नवीन स्टोअरमध्ये फॅशनेबल पोशाखांची श्रेणी आहे, ज्यामध्ये शॉर्ट्स, टी-शर्ट्स, जीन्स, कॅज्युअल शर्ट्स व ट्राऊजर्स, कॅज्युअल पॅण्ट्स आणि रात्रीसाठी फॅशन ट्राऊजर्स व शर्टसचा समावेश आहे.
स्टोअरमधील एैसपैस जागेमधून आधुनिक डिझाइनसह आकर्षकता दिसून येते, ज्यामध्ये आकर्षक सजावट, उत्साहवर्धक प्रकाश आणि उत्तमरित्या प्रशिक्षित उत्साही सेल्स असोसिएट्स आहेत, जे स्टोअरमध्ये ग्राहक अनुभव अधिक उत्साहित करतात. आकर्षक ऑफर्सचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूरमधील लॉमेन स्टोअरला भेट द्या. विशेषत: उत्साही व झपाट्याने विकसित होत असलेले शहर कोल्हापूरसह महाराष्ट्रात आमच्या तिसऱ्या स्टोअरचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. महाराष्ट्रातील झपाट्याने विकसित होणारे शहर कोल्हापूर आमचे धोरणात्मक विस्तारीकरण व विकास योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या विस्तारीकरणामधून ग्राहकांना अपवादात्मक फॅशन व विनासायास शॉपिंग अनुभव देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा देण्यास उत्सुक आहोत.”असे केवल किरण क्लोथिंग लि.चे संचालक दिनेश जैन म्हणाले. ”कोल्हापूरमध्ये आमच्या नवीन स्टोअरचे उद्घाटन लॉमेनसाठी उत्साहवर्धक पाऊल आहे. आम्हाला कोल्हापूरमधील फॅशनप्रेमींसाठी आमचे नवीन कलेक्शन्स आणि विशेष प्रमोशन्स सादर करण्याचा आनंद होत आहे. ग्राहकांना स्टाइल, दर्जा व नाविन्यता येथे मिळणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, शहरामधील आमचे स्टोअर फॅशनप्रेमींसाठी आवडते बनेल.”असे केवल किरण क्लोथिंग लि.चे संचालक विकास जैन यांनी व्यक्त केले.