Home News हद्दवाढीसह कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबध्द: मंत्री उदय सामंत ;क्रीडाई दालन बांधकाम प्रदर्शनाचे उद्घाटन

हद्दवाढीसह कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबध्द: मंत्री उदय सामंत ;क्रीडाई दालन बांधकाम प्रदर्शनाचे उद्घाटन

0 second read
0
0
22

कोल्हापूर: क्रिडाई कोल्हापूर यांच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य बांधकाम प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, क्रिडाईचे पदाधिकारी, सदस्य, बांधकाम क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत क्रिडाई संस्थेच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री महोदय यांची लवकरात लवकर बैठक होण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.शहराची हद्दवाढ, पंचगंगा शुध्दीकरण, कोल्हापूरचे पर्यटन, निसर्ग व ऐतिहासिक वारसा जपला जावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी व विकासकामांसाठी सर्व लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करत आहेत, हे महत्वाचे आहे. कोल्हापूरचा हा विचार राज्यासाठी आदर्शवत आहे. एमआयडीसी साठी जागेची निश्चिती झाल्यावर उद्योगधंद्यांनाही मंजुरी देण्याबाबत विचार केला जाईल.सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न सहजपणे पूर्ण होण्यासाठी क्रिडाईने सर्वांना सोबत घ्यावे, यासाठी अन्य शहरातील व्यावसायिकांनाही मार्गदर्शन करावे.अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सकारात्मक मानसिकतेने समन्वयाने काम केले तर निश्चितच चांगला बदल घडतो. कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, देशाच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबरच पिण्याचे पाणी, रस्ते व अन्य आवश्यक त्या सेवा सुविधा देणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे महत्वाचे डेस्टिनेशन होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत लवकरात लवकर बैठक घेऊन कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्यात येईल.श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा यासह अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात येत असून शेंडा पार्क मध्ये मेडिकल हब तयार होईल, त्यादृष्टीने या भागात बांधकामाचे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी नियोजन करावे.आमदार सतेज पाटील म्हणाले, क्रिडाईने आजवर मोलाचे काम केले असून कोल्हापूरच्या विकासासाठी यापुढेही महत्वपूर्ण योगदान द्यावे. महापूर, कोरोना परिस्थितीसह आजवर जिल्ह्यावर आलेल्या प्रत्येक संकट काळात मदतीचा हात देण्याचे मोलाचे काम संस्थेने केले आहे. भविष्यात कोल्हापुरात होणाऱ्या बांधकामांना योग्य दिशा देण्याचे काम क्रिडाईने करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी क्रिडाईचे सदस्य, आर्किटेक्ट यांनी बांधकाम प्रोजेक्टचे योग्य नियोजन करावे. पश्चिम महाराष्ट्रातील गतीने विकास होणारे तसेच सेकंड होम साठीचे मोठे शहर म्हणून कोल्हापूरचा झपाट्याने विकास होत असून यासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर मार्केटिंग करावे. आयटीपार्क, मगरपट्टा सिटी सारखे प्रोजेक्ट कोल्हापूर मध्ये उभारावेत, यासाठी क्रिडाईच्या बांधकाम व्यावसायिकांनी एकत्रित प्रयत्न करावेत.आमदार जयंत आसगावकर म्हणाले, क्रिडाई च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येतात. क्रिडाईने कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा दत्तक घेवून त्या मॉडेल स्कूल बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा.उद्योग क्षेत्राप्रमाणे बांधकाम विभागाचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत बैठक घ्यावी. येत्या काळात शेंडा पार्क, पाचगाव, गिरगाव भाग विकसित होत असून त्या भागाचाही विकास व्हावा, असे आवाहन ललित गांधी यांनी केले.के. पी. खोत म्हणाले, क्रेडाईने सामाजिक बांधिलकी जोपासून शासन व प्रशासनासोबत काम केले आहे. नगररचना विभागाच्या रिक्त जागा भराव्यात. बांधकाम परवान्याच्या प्रक्रिया सुलभ कराव्या, शहराचा विकास आराखडा तयार झाला आहे, पण त्याची अंमलबजावणी होण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत.कोल्हापुरात अनेक विकास कामे होत आहेत. कोल्हापूरहून कोकणाला जोडणारी रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी सर्व्हेक्षण होवून केंद्र सरकारचा निधी मिळवण्यासाठी उद्योग मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी क्रिडाईचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर, खजानीस अजय डोईजड,दालन २०२४ चे व्हाईस चेअरमन प्रमोद साळोखे, समन्वयक अतुल पोवार ,सचिव गणेश सावंत, सहसचिव संग्राम दळवी, खजानीस श्रीधर कुलकर्णी, सहखजानीस उदय निचिते, क्रीडाई कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी आणि सभासद तसच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते . सचिव संदीप मिरजकर यांनी आभार मानले .

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…