
कोल्हापूर: क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने महासैनिक दरबार लॉन्स, कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य बांधकाम प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या वतीने आयोजित “स्त्री शक्ती आणि आयुर्वेदाची महती” या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयश्री जाधव यांची उपस्थिती होती.क्रिडाईने या दालनाच्या माध्यमातून कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली वेगवेगळ्या ठिकाणचे बांधकाम व इमारत साहित्य विषयक नवनवीन प्रोजेक्ट याबाबतची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे हे दालन वैशिष्टपूर्ण आहे. क्रीडाईने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोवर शहराच्या विकासात भरीव योगदानही दिले आहे.आज धावत्या घडीला स्त्रीयांच्या आरोग्याची दक्षता घेऊन त्यांच्यासाठी हे व्यासपीठ खुले केल्याबद्दल तसेच प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य सुविनय विनायक दामले यांचे मार्गदर्शनाखाली विशेष व्याख्यान आयोजित करून स्त्रियांचा सन्मान केल्याप्रसंगी आमदार जयश्री जाधव यांनी क्रिडाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कोल्हापुरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांनी, नागरिकांनी या दालनास आवर्जून भेट द्यावी असे आवाहनही यानिमित्ताने केले.या कार्यक्रमाप्रसंगी मधुरीमाराजे छत्रपती, आयुर्वेदाचार्य वैद्य सुविनय विनायक दामले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, क्रिडाईचे अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर, खजिनदार अजय डोईजड तसेच संगिता माणगांवकर, मोनिका बकरे, अर्चना पवार आदींसह क्रिडाईचे सर्व पदाधिकारी, सर्व व्यावसायिक महिला, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.