
कोल्हापूर /प्रतिनिधी :घरासाठी जसा बांधकामाचा पाया मजबूत हवा तसा जीवनामध्ये शरिराचा आरोग्य पाया मजबूत हवा. याच सुदृढ जीवनासाठी माणसाने व्यायाम, आहार आणि भारतीय पारंपरिक जीवनपद्धती अवलंबल्यास आरोग्य चांगले राहते, असे प्रतिपादन आयुर्वेदाचाय वैद्य सुविनय दामले यांनी केले.
क्रिडाई कोल्हापूरतर्फे महासैनीक दरबार हॉल येथे आयोजीत दालन २०२४ बांधकाम प्रदर्शनादरम्यान स्त्रीशक्ती आणि आर्युवेदाची महती या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अभिनेत्री प्राजक्ता माळी, आमदार जयश्री जाधव, मधुरिमाराजे छत्रपती आणि पोलीस उप अधीक्षक जयश्री देसाई यांची होती. स्वागत क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी केले. यावेळी क्रिडाई वुमेन्स विंगच्या संगीता माणगांवकर, मोनिका बकरे, अर्चना जाधव, किरण सारडा उपस्थित होते.वैद्य दामले म्हणाले, आरोग्याचे सूत्र हे स्त्रीच्या हातात असते. आपले जुने वेद, आयुर्वेद याचे मोठे महत्त्व आहे.
कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनीही उपस्थित महिलांना हेल्थ टिप्स देताना अनेक सोपे मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी दररोज नियमित रात्री १० ते सकाळी ६ झोप, आहार (वेळ-पदार्थ), अल्प आहार, पाणी पिण्याची वेळ, व्यायाम, प्राणायाम-ध्यान, अशा अनेक गोष्टींचे महत्त्व आणि उपयोग विषद केले. कोल्हापूरने आपला कोल्हापूरी बाणा जपलाय याचा आनंद होत आहे. हे सांगताना त्या म्हणाल्या, पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुयोग्य मेळ म्हणजे कोल्हापूर होय. विकासासोबतच कोल्हापूरने आपली संस्कृती जपली आहे. त्यामुळे जगभरात कोल्हापूरला मान असल्याचे माळी यांनी स्पष्ट केले. क्रिडाई दालनने भरवलेले प्रदर्शन नक्कीच कौतुकास्पद असल्याचेही माळी यांनी सांगितले.
क्रिडाई दालन २०२४ या बांधकाम प्रदर्शनाला कोल्हापूरसह प्रश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून रविवारी सुट्टीदिवशी हजारो लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. अनेकांनी प्रत्यक्ष स्टॉलला भेट देऊन नवनवीन प्रकल्पांची माहिती घेतली. तसेच कोल्हापुरातील बांधकाम क्षेत्रातील प्रगतीबद्दल अनेक गुंतवणूकदारांनी कौतुकही केले. दरम्यान सोमवारी दालन प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून दुपारी ४ वाजता शासनाच्या महसूल वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.
जीवन पद्धतीवर अवलंबून आहे. स्त्री-पुरूष ही रथाची दोन चाके आहेत. आयुर्वेदात रिर्पोट्सना
महत्त्व नाही. जीवनशैली महत्त्वाची आहे. सोवळे ही पुराण परंपरा नाही तर स्वच्छतेचे एक माध्यम आहे. आपल्या प्राचीन परंपरेतील प्रत्येक गोष्ट ही मानवी जीवनाच्या आरोग्याशी निगडीत आहे. हे सांगताना दामले यांनी पंचामृत, योगासने, नैवेद्य याचे आरोग्यदायी महत्त्व मांडले.
आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूरचा वेगाने विकास होत असून शहराच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत मांडले. तसेच विधीमंडळात शासनस्तरावर हद्दवाढीसाठी शहराचा आमदार म्हणून आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मधुरीमाराजे यांनी क्रिडाई दालन प्रदर्शनाचे कौतुक करताना राज्याला हेवा वाटणारे प्रदर्शन असल्याचे मत मांडले.
यावेळी उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमार, संदीप मिरजकर, अतुल पोवार, चेतन वसा, अजय डोईजड, गणेश सावंत, श्रीधर कुलकणी, प्रमोद साळुंखे उपस्थीत होते.