
कोल्हापूर/प्रतिनिधी : सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि KITE-Ai Technologies Pvt. Ltd., Pune यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय स्तरावरील फार्मा एआय.आयटी करिअर कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे अशी माहितीआर. एल. तावडे फाउंडेशन्सच्या सचिव श्रीमती शोभा तावडे,संचालक डॉ. ए.आर.कुलकर्णी,प्राचार्य आर. एस.बगली,समन्वयक भूषण वर्णे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील संधींबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.कार्यशाळेचे उद्घाटन उद्या १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता प्रमुख पाहुणे कोफोर्ज कोल्हापूर शाखा उपाध्यक्ष मा. सचिन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आर. एल. तावडे फाउंडेशन्सच्या सचिव श्रीमती शोभा कि. तावडे आणि संयुक्त सचिव श्री. सुजय कि. तावडे उपस्थित राहणार आहेत.या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमधून २५० हुन आधीक बी.फार्मसी आणि एम.फार्मसी विद्यार्थी सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील अत्याधुनिक करिअर संधी, क्लिनिकल रिसर्च, मेडिकल कोडिंग, SAS सॉफ्टवेअर, डेटा एनालिटिक्स आणि फार्माकोव्हिजिलन्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यशाळेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले खालील अनुभवी तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सौ. गायत्री शार्दूल -१४+ वर्षांचा अनुभव (क्लिनिकल ड्रग डेव्हलपमेंट व इंडस्ट्री रेडी ट्रेनिंग)
श्री. पीयूष राजपूत – १०+ वर्षांचा अनुभव (क्लिनिकल एनालिटिक्स आणि करिअर डेव्हलपमेंट)
सौ. सुचिता शिंदे – १०+ वर्षांचा अनुभव (मेडिकल कोडिंग आणि कंप्लायन्स)
सौ. प्रतिक्षा सिंग – १३+ वर्षांचा अनुभव (प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि डेटा एनालिटिक्स)
श्री. राहुल जगताप – १५+ वर्षांचा अनुभव (ग्लोबल SAS प्रोग्रामिंग आणि बायोस्टॅटिस्टिक्स)
सौ. गायत्री पंडित – SAS प्रमाणित फार्मसी ग्रॅज्युएट (प्रॅक्टिकल SAS डेमो मार्गदर्शन)
श्री. सूरज शिंदे -१०+ वर्षांचा अनुभव (वेब मॅनेजमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट)
सदरची कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता टीपीओ श्री. भुषण वर्णे – समन्वयक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर वर्ग परिश्रम घेत आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. राजकुमार बगली आणि संचालक डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण आणि उद्योगक्षमतेला चालना देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करत असते. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगजगताची प्रत्यक्ष माहिती आणि त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यास मदत मिळणार आहे. सदर कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून, अशा उपक्रमांमुळे करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व मुलांना नवी दालने खुली होणार आहेत.