
कोल्हापूर/प्रतिनिधी : आजकालच्या माहीती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान खुप प्रगत झाले असून याच तंत्रज्ञानासह आत्याधुनिक सेवा आणि सुविधा देण्यासाठी कोल्हापूरात नव्यानेच सज्ज झाले आहे. डॉ. नुपूर राहुल पाटील खळतकर यांचे डर्मा लॅब स्किन क्लिनिक आणि डॉ. राहुल पाटील यांचे अथ्रायटिस अँन्ड हुमॅटॉलॉजी सेंटर नागाळा पार्क, कलेक्टर ऑफीस समोर सुरू होत असलेल्या या भव्य सेंटरचे उद्घाटन येत्या सोमवारी दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सन्माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितिनजी गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती डॉ. राहुल पाटील आणि डॉ. नुपूर राहुल पाटील खळतकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या बद्दल अधिक माहीती देताना ते म्हणाले डॉ. राहुल पाटील हे रूमेटॉलॉजिस्ट आणि संधिवात तज्ञ असून यांचा संधिवात शास्त्रात गेल्या 7 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून प्रौढ आणि मुलांमध्ये सर्व प्रकारचे संधिवात आणि स्वयंप्रतिकार आजारांवर उपचार करणारे ते विशेषज्ञ असून रूमेटोइड आर्थारायटीस, अॅकीलोझिंग स्पॉन्डिलायटिस, ल्यूप्स (SLE), ऑस्टीयो आर्थारायटीस, गाउट, स्जोग्रेन्स सिंड्रोम, व्हॅस्क्युलायटिस, मायोसिटीस या सर्व उपचारांमध्ये विशेष म्हणून ते उच्च प्रकारच्या वैदयकिय सेवा पूरवतात. जास्तीत जास्त रूग्णांवर अत्याधूनिक सेवेसह प्रभावी उपचार प्रणाली या सेंटरमध्ये राबवण्यात येतात.
यासह डॉ. नुपूर पाटील त्वचारोगतज्ञ असून त्वचा आणि डिव्हीएल मध्ये एन केपी साल्वे नागपूर इथल्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. मुंबईमधून त्यांनी लेझर आणि कॉस्मेटीक डर्मोंटोलॉजीमध्ये फेलोशिप घेतली असून डर्मा लॅब निरोगी त्वचा आणि केसांसाठी सर्व अत्याधुनिक उपचारांसह कोल्हापूरकरांसाठी एक नवीन सौंदर्यशास्त्र क्लिनिक बनणार आहे. केसांच्या वाढीसाठी पी.आर.पी., मिसोथेरपी, जी.एफ.सी., अॅन्टीएजिंग वर येथे आधुनिक उपचार व बोटोक्स, फिलर्स केले जाणार आहेत.
सर्व सौंदर्यसेवा एकाच छताखाली देण्यास अत्याधुनिक प्रणाली सर्व रुग्णांना हे सेंटर नक्कीच समाधानी बनवेल. आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा सुविधा पुरवण्याचा प्रयत्न या सेंटरमध्ये केला जातो. क्वालिटीच्या बाबतीत कोणतीही तडजोड येथे केली जात नसून डर्मा लॅबचे सर्व मशिन्स आधुनिक आणि USFDA सर्टीफाईड असून पिगमेंटेशन, पेनलेस लेझर हेअर रिडक्शन, अॅन्टीएजिंग, अॅक्ने सह फिलर्स, बोटोक्स, हेअर फॉल्स या सर्व टिट्रमेंट्समध्ये आम्ही स्पेशालिस्ट आहोत.गेल्या 3 वर्षांपासून आम्ही कोल्हापूरात प्रॅक्टीस करत आहोत. पण आता कोल्हापूरात जागतिक दर्जाच्या सुविधा घेउन प्रशस्थ आणि मोठया स्ववास्तुत स्थलांतरित होत आहोत. तरि कोल्हापूरकरांसाठी एक नवा कोरा पर्याय डर्मा लॅब आणि आर्थारायटीस अॅन्ड रूमॅटॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध झाला असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पाटील