
कोल्हापूर : डिजिटल युगात बँक व्यवहारांच्या बाबतीत अजूनही कोट्यावधी लोक वंचित आहेत. अनेक लोक रोख व्यवहारांना पसंत करतात. घराजवळील दुकांनामधून लोकांना सहज बँक व्यवहार करता यावेत स्थानिक दुकांच्या मधून जमा होणाऱ्या कॅशचे योग्य व्यवस्थापन व्हावे या हेतूने लोकांना एक कार्यक्षम पर्याय फिनो पेमेंट बँक देत असल्याचे फिनोचे झोनाल हेड उमेश कदम यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या पैशाच्या व्यवहाराचे व्यवस्थापन स्थानिक पातळीवर होते. असंख्य छोट्या व्यावसायिकांना आपली कॅश डिजिटल स्वरूपात सहज करता येते. यामुळे रोखीचा धोका टाळला जातो. इतर बँकांचे असिस्टंट बँक म्हणून काम करत असल्याने इतर बँकेचे व्यवहारही फिनो सेंटर वरून सहज करता येतात. फिनो पेमेंट बँक चे देखील खाते उघडू शकतात तसेच इतर सर्व व्यवहार करू शकतात या सेवेचा उपयोग लोकांनी करावा असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस अनिल पवार यांच्यासह फिनोचे इतर अधिकारी व सहकारी उपस्थित होते.