
इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटरीयर डिजाईनर्स च्या कोल्हापुर विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रचंड उत्साहात व खेळीमेळीत पार पडली…
इलेक्शन को-ऑर्डिनेटर संजय चराटे यांनी निकाल जाहीर केलेप्रमाणे 2021-2023 या दोन वर्षासाठी इंटरीयर डिजाईनर चंदन मिरजकर यांची चेअरमनपदी, निर्माण ट्रेडर्सचे शरद पवार व्हाईस चेअरमन ट्रेड पदी, आर्कि. तेजस पिंगळे यांची सचिवपदी तर आर्कि. किशोर पाटिल यांची खजानीसपदी निवड झाली. सोबत आर्कि. सचीन बोरा सहसचिव व इंटरीयर डिजाईनर प्रशांत पाटिल चेअरमन ईलेक्ट, इंजिनिअर महेश खांडके ट्रेड मेंबर तसेच इंटरीअर डिजाईनर गौरव काकडे, इंटरीयर डिजाईनर अभिजित चव्हाण हे बोर्ड डायरेक्टर म्हणुन काम पाहतील.
IIID ही संस्था पुर्ण भारतातील 31 मोठ्या शहरात कार्यरत असुन दुबई येथे नविन विभाग सुरु केला आहे. इंटरीयर डिजाईनर्स आणि संलग्न साहीत्य पुरवणारे व्यावसाईक यांची ही संस्था ग्राहकाना उत्तम सेवा देण्यासाठी, याचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी, प्रतिथयश डिजाईनर्सच्या कलाकृतींचे प्रदर्शन व प्रशिक्षण आयोजण करण्यासाठी नेहमीच कार्यतत्पर असते.
कोल्हापुरात IIID संस्थेने आजपर्यंत हफिज कॉन्ट्रक्टर, राजीव सेठी, करण ग्रोव्हर, जेम्स लॉ ख्रिस्तोफर बेनिन्जर, शिरीष बेरी यासारख्या मान्यवर वास्तु विशारद व्यक्तींच्या कार्यशाळा यशस्विरित्या आयोजित केल्या आहेत.
या वार्षिंक सर्वसाधारण सभेसाठी आर्कि. संदीप घोरपडे, इंटरीयर डिजाईनर संजय चराटे, विवेक सावंत, आर्कि.नविन लाड, पार्शद वायचळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले… IIID कोल्हापुर संस्थेचे संस्थापक चेअरमन आर्कि. मोहन वायचळ यांनी संस्थेच्या इतिहासाबद्दल विशेष माहिती दिली. सभेचे सूत्रसंचालन आर्कि. सचिन बोरा यांनी केले तर सचिव आर्कि. तेजस पिंगळे यांनी आभार प्रदर्शन केले. रेजीडेंसी क्लब येथे आयोजित केलेल्या सभेस सदस्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.