Home News केडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेणार, केडीसीसी बँक ही सर्वसामान्य माणसाला आधार देणारी बँक…

केडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेणार, केडीसीसी बँक ही सर्वसामान्य माणसाला आधार देणारी बँक…

2 second read
0
0
29

कोल्हापूर : भाषणात ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच व्यवसायांना केला कर्जपुरवठा.येणाऱ्या काळात केडीसीसी बँक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेणार.येत्या वर्षभरात दोनशे कोटी नफ्याचे व दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट.पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, केडीसीसी बँक ही सर्वसामान्य माणसाला आधार देणारी बँक, ही बँक चांगली राहिली पाहिजे, ती टिकली पाहिजे- वाढली पाहिजे ही आम्हा नेतेमंडळींची नैतिक जबाबदारी.विरोधकांनो; निवडणुकीच्या प्रचारात प्रसंगी आमच्यावर व्यक्तिगत टीका करा. परंतु; बँकेचा कारभार चांगला आहे, हेही कधीतरी मान्य करा.
देशासह जगात खाजगीकरणाचे वारे वाहत असताना सहकाराने या जिल्ह्याला भरपूर दिलय. तो टिकला पाहिजे, वाढला पाहिजे.माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, शेतकऱ्यांचे हे वैभव टिकवायचे असेल तर कपबशी चिन्हासमोर पॅनेल टू पॅनेल मतदान करा.
*आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवण्यात ही बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे.ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी ही बँक लोकाभिमुख केली.आमदार पी. एन. पाटील म्हणाले, या निवडणुकीत संपूर्ण आघाडीचे बहुमत हे निश्चित आहे.व्यासपीठावर आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, माजी महापौर आर. के. पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंगतात्या पाटील, ऊदयसिंगराव पाटील- कौलवकर, सत्यजित जाधव, आसिफ फरास, राजेश लाटकर, आदिल फरास, शारंगधर देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.तसेच मदन कारंडे, प्रदीप पाटील- भुयेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, सौ. स्मिता गवळी, श्रुतिका काटकर, विजयसिंह माने आदी उमेदवारही उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…