
अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ कालवश
पुणे : जेष्ठ समाजसेविका व अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचे पुणे येथील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये आज ( ८ वाजून १० मिनिटांनी) ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या. अनेख खडतर प्रसंगांना तोंड देत समाजकार्य करत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जाण्यामुळे अखंड महराष्ट्र शोककळा पसरली आहे.