Home News KDDC BANK : माविआ वर्चस्व

KDDC BANK : माविआ वर्चस्व

4 second read
0
0
36

KDDC BANK : माविआ वर्चस्व

तालुकानिहाय मतदान
दुपारी १२ वा.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कोरे यांना २४३ मते मिळाली तर विरोधी विजयसिंह पाटील यांना ३८ मते मिळाली आहेत. एकूणच कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाने वर्चस्व राखले आहे.
शिरोळ तालुका*
शिरोळ तालुक्यातील राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ९८ मते मिळाली तर दत्त शिरोळचे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते मिळाली. यामध्ये १४९ मते होती.
भुदरगड तालुका*
भुदरगड तालुक्यातील रणजीत सिंह कृष्णराव पाटील त्यांना १४४ मते मिळाली. तर यशवंत नांदेकर यांना ६२ मते मिळाली. यामध्ये रणजीत सिंह पाटील यांना जादा मते पडल्याने विजयी झाले.
आजरा तालुका
अशोक चराटी यांना ४८ मते मिळाली तर सुधीर देसाई यांना ५७ मते मिळाली. यामध्ये सुधीर देसाई ९ मतानी विजयी झाले. तर शाहूवाडीमध्ये रणवीर गायकवाड यांना ६६ मते मिळाली. तर सर्जेराव पाटील यांना ३३ मते मिळाली. जादा मते मिळाल्याने रणवीर गायकवाड हे विजयी झाले.
गडहिंग्लज तालुका*
गडहिंग्लजमधून संतोष पाटील यांना शंभर मते मिळाली तर विनायक उर्फ अप्पी पाटील यांना ६ मते मिळाली. संतोष पाटील यांना जादा मते पडल्याने विजयी झाले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा झालेल्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर हे ९८ मतांनी विजयी झाल्याने जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यात एकच जल्लोष साजरा केला जात आहे. तर दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते मिळाल्याने सर्वपक्षीय नेत्यांचे पानिपत झाले आहे.
*शाहुवाडीत सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे.*
सर्जेराव पाटील – पेरीडकर पराभूत झाले आहेत. तर रणवीर गायकवाड निवडून आले आहेत. रणवीर गायकवाड यांना ९९ तर सर्जेराव पाटील – पेरीडकर यांना ६६ मते मिळाली आहेत.
कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे पराभूत झाले. भुदरगड-राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर विजयी झाले आहेत.
आतापर्यंतच्या निकालात सत्ताधारी गटातील ८ उमेदवार तर विरोधी गटातील ४ उमेदवार विजयी*

*विरोधी गटातील विजयी उमेदवार*
खासदार संजय मंडलिक,
अर्जुन अबिटकर,
बाबासाहेब पाटील आसुरलेकर
रणवीर गायकवाड विजयी
*सत्ताधारी गटातील विजयी उमेदवार*
राजेंद्र पाटील-यड्रावकर
विनय कोरे
सुधीर देसाई
रणजित पाटील
संतोष पाटील विजयी
प्रताप उर्फ भैय्या यशवंत माने
विजयसिंह अशोकराव माने
स्मिता युवराज गवळी

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…