Home News राहुल्याच्या” भूमिका साकरणे खूप कठीण होते-आयुष शर्मा

राहुल्याच्या” भूमिका साकरणे खूप कठीण होते-आयुष शर्मा

2 second read
0
0
20

*”राहुल्याच्या” भूमिका साकरणे खूप कठीण होते-आयुष शर्मा*
‘अंतिम-द फायनल ट्रुथ’ आता यशस्वी ठरला आहे.या चित्रपटात सुपरस्टार सलमान खान समोर तोडीस तोड अभिनय करणारा आयुष शर्माने आपल्या राहुल्याच्या भूमिकेसाठी खूप उत्सुक होता.या चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्याचा हा उत्साह नक्की जाणवत होता.अगदी मुरलेल्या कलाकारासारखा अनेक प्रश्नांना सामोरे जात तो सहज उत्तर देत होता.लवयात्री नंतर अंतिम- द फायनल ट्रुथ चित्रपटात त्याची ‘राहुल्या’ या भूमिकेसाठी कशी निवड झाली हे सांगताना तो म्हणाला, पहिल्या चित्रपटात रोमॅंटिक भूमिका साकारल्यानंतर अंतिम ची ऑफर महेश मांजरेकर सरांनी दिली.ही भूमिका सर्वस्वी वेगळी होती.सलमान खान फिल्मसची ही पहिलीच निर्मिती,आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी लेखन केले असल्याने त्यांना माझ्यात त्यांचा राहुल्या दिसला .मला त्यांनी विचारले पण मी त्यांना इन्स्पेक्टर राजवीर कोण करणार आहे हे विचारताच त्यांनी सलमान खान असे उत्तर दिले.मी दचकलोच.मी जरी सलमान खानच्या घरचा जावाई असलो तरी चित्रपटात सलमानजींसमोर किती टिकू शकतो याचा विचार करत होतो.परंतु महेशजींनी मला पटवून दिले, आत्मविश्वास वाढवला आणि मी या चित्रपटाचा भाग झालो.या चित्रपटासाठी कोणती तयारी केलास या प्रश्नावर आयुष बोलला,प्रथम सलमान खान समोर उभे रहाणे हेच मोठे आव्हान होते, त्यासाठी सिक्स पॅक बाॅडी दाखविणे आवश्यक होते,त्यासाठी मी खूप मेहनत घेतली.राहुल्या ही भूमिका माझ्या स्वभावापेक्षा वेगळी होती त्यामुळे मला त्याचा अभ्यास करावा लागला.स्टाईलपासून बोलण्यापर्यंत बदल केला.मी पुणेरी गुंड, महाराष्ट्रीयन कसा दिसेन‌ यासाठी खूप चर्चा करून भूमिका साकारली.हा चित्रपट मुळशी पॅटर्न वर आधारित असल्याने राहुल्याच्या भूमिकेची तुलना होणार असे वाटले का?यावर आयुष म्हणाला, नक्कीच वाटले,पण महेशजींनी हा चित्रपट पुर्णतः वेगळा लिहिला आहे.मुळशी पॅटर्नचा केवळ आत्मा व मुख्य विषय जमीन हा संदर्भ वापरला आहे.बाकी यातले राजवीर सिंग,राहुल्या व इतर कॅरेक्टर वेगळी आहेत.मुळशी पॅटर्न हा जमिनीचा व चुकीच्या वाटेवर गेलेल्या युवकाची कथा आहे.तर अंतिम हा चित्रपट कायद्याचे अस्तित्व दाखविणार्या पोलिस अधिकाऱ्याची कथा आहे.सलमानबरोबर काम करताना दडपण होते हे सांगतानाच शुटिंग दरम्यान अनेकवेळा अपघात झाले,कोरोना काळातील नियमाने अडचणी आल्या पण हा चित्रपट अखेर पुर्ण केला याचा आनंद वाटतो असेही त्यांने कबुली दिली.या चित्रपटात सलमान,महिमा मकवान, सचिन खेडकर, महेश मांजरेकर यांच्याही भूमिका उठावदार असल्याचे सांगत आयुष पुढे म्हणाला, भू माफिया, राजकारण, पोलिस अधिकारी, गुन्हेगारी जगत यांच्या भावभावनांची,चांगल्या वाईटाची कथा यात दिसणार असून हा प्रेक्षकांसाठी परफेक्ट पॅकेज आहे..आणि तो आवडेल.या चित्रपटातील श्रवणीय गाणी व धमाकेदार ॲक्शन प्रेक्षकांचे मनोरंजन करेल यात शंका नाही असा विश्वास ही आयुष शर्माने शेवटी व्यक्त केले. 

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…