
कोल्हापूर/प्रतिनिधी : ह्रदयाला कोविडचा दुष्परिणाम दिसून आल्यास ह्रदयाला निरोगी ठेवण्यासाठी आपली योग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे . छोट्याशा लक्षणांवरून निदान होऊ शकते. यासाठी रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवा असे उदगार डॉ. अर्जुन आडनाईक यांनी काढले.जनरल प्रँक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूरच्या आजीवन सभासदांसाठी स्वास्तिक हाँस्पिटल तर्फे प्रसिद्ध ह्रदय रोगतज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांनी कोविड आणि ह्रदयविकार या विषयावर मार्गदर्शन केले. वामन ओरिएंटल क्राऊन हाँटेलमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.आडनाईक बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी जीपीएच्या अध्यक्षा डॉ. उषा निंबाळकर होत्या.बेस्ट कार्डीओलाँजीस्ट म्हणून राज्यपाल श्री. भगतसिंग कोशारीं यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल जीपीए अध्यक्षांच्या हस्ते डॉ. आडनाईक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात डॉ. उषा निंबाळकर यांनी असोसिएशनच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. तर डॉ. अर्जुन आडनाईक यांनी ह्रदय आणि कोविड नियोजन याची विस्तृत माहिती दिली. यावेळी एम. डी.परीक्षेत यश मिळवल्याबद्दल सभासदांच्या मुलांचा सत्कार करण्यात आल.यावेळी डॉ. विलास महाजन,डॉ. शिवराज देसाई, डॉ. शिवपुत्र हीरेमठ, महापालिका आरोग्यधिकारी डॉ.रमेश जाधव आदी उपस्थित होते. सचिव डॉ. महादेव जोगदंडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. वर्षा पाटील यांनी आभार मानले