
कोल्हापूर :‘ओला इलेक्ट्रिक’च्या वतीने तिच्या विद्युत वाहनांच्या देशव्यापी टेस्ट राइड शिबिराचे आयोजन आज कोल्हापूर येथे करण्यात आले.केवळ निमंत्रितांनाच परवानगी असणाऱ्या या ‘टेस्ट राइड्स’ना गृह (शहरी), गृहनिर्माण, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कामकाज आणि माजी सैनिक कल्याण या खात्यांचे राज्यमंत्री, तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या प्रसंगी ‘ओला इतेक्ट्रिक’चे कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे प्रमुख बी. सी. दत्ता हे उपस्थित होते. कावळा नाका येथील डी. वाय. पाटील मॉल येथून या टेस्ट राइड्सना सुरुवात झाली.कोल्हापूरमधील हे टेस्ट राइड शिबिर 3 दिवस चालणार आहे. कंपनीच्या ‘एस1 प्रो’ स्कूटर्सच्या संपूर्ण भारतातील ग्राहकांकडून होणाऱ्या टेस्ट राइड्सचा हा भाग आहे. महाराष्ट्रात मुंबई व पुणे यांच्यानंतर आता कोल्हापुरात ग्राहकांसाठी हे टेस्ट राइड शिबिर आयोजित झाले. तसेच इतर अनेक ठिकाणी ग्राहकांना ‘डोअरस्टेप टेस्ट राइड’चा पर्याय देण्यात येत आहे.ज्या ग्राहकांनी ‘ओला एस1 प्रो’ स्कूटरची नोंदणी २० हजार रुपये भरून केली आहे किंवा स्कूटरची संपूर्ण रक्कम भरली आहे, अशांना या टेस्ट राइड प्राधान्याने देण्यात येत हेत. ज्यांनी ४९९ रुपये भरून स्कूटरची नोंदणी केली आहे, त्यांची टेस्ट राइडच्या स्लॉट्समध्ये आगाऊ नोंदणी करून घेण्यात येत आहे.या प्रसंगी गृह (शहरी), गृहनिर्माण, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कामकाज आणि माजी सैनिक कल्याण या खात्यांचे राज्यमंत्री, तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील म्हणाले, “माझ्या गावी, कोल्हापूरमध्ये ‘ओला’चे स्वागत करताना मला आनंद होत आहे. विद्युत वाहने हा भविष्याचा मार्ग आहे आणि आमची शाश्वततेची उद्दिष्टे साध्य करण्यात या वाहनांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. वाहतूक क्षेत्रातून कार्बन या घटकाचे उच्चाटन करण्यास, तसेच राज्याला ईव्ही हबमध्ये रूपांतरित करण्यास महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. अलीकडेच कोल्हापूर महानगरपालिकेने ‘ईव्ही चार्जिंग स्टेशन्स’ उभारण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांना, नागरिकांना मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी ही पहिलीच महापालिका असून हा एक विक्रम आहे. ‘ओला’सारख्या कंपन्या किफायतशीर, सुलभ अशी विद्युत वाहने विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्णतेचा उपयोग करीत आहेत, यातून आमची कटिबद्धता पूर्ण होण्यात मदतच होणार आहे.”
‘ओला एस1 प्रो’ ही ‘मेड-इन-इंडिया फॉर द वर्ल्ड’ इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ‘ओला फ्युचरफॅक्टरी’ येथे ती उत्पादित केली जाते. हा जगातील सर्वात मोठा, सर्वात प्रगत आणि शाश्वत तत्वाने चालणारा दुचाकीचा कारखाना आहे. ‘ओला फ्युचरफॅक्टरी’ ही 500 एकर जागेवर वसलेली एकात्मिक सुविधा आहे. हा कारखाना महिलांकडून चालविण्यात येतो.सर्वोत्कृष्ट डिझाइन, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट कार्यप्रदर्शन यांसारख्या अनेक अग्रगण्य वैशिष्ट्यांनी युक्त अशी ओला एस1 प्रो स्कूटर दहा अद्वितीय आणि व्हायब्रंट रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही स्कूटर १५ ऑगस्ट २०२१ रोजी सादर करण्यात आली आणि १५ डिसेंबर २०२१पासून तिचे वितरण ग्राहकांना सुरू झाले.‘ओला इलेक्ट्रिक’ने अलीकडेच वाहनांसाठीचे प्रगत अभियांत्रिकी व डिझाइनसाठीचे जागतिक केंद्र ‘ओला फ्युचरफाऊंड्री, कोव्हेंट्री, यूके’ येथे स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे केंद्र बंगळुरूमधील ओला कॅम्पस येथील डिझाइन व अभियांत्रिकीच्या टीम्सबरोबर समन्वयाने काम करेल.