
कोल्हापूर: जागतिक कॅन्सर दिन तसेच कै.भास्कर पवार यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त दि.४ फेब्रुवारी रोजी
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ऑन्को प्राईम कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने “सांजवात सेवाश्रम” हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.वैद्यक शास्त्राच्या मर्यादेपलीकडे आजार गेलेल्या कॅन्सर रुग्णांचे उर्वरित आयुष्य कमीत कमी वेदनादायी होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी या सेवाश्रमामध्ये सेवा देणार असल्याची माहिती कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुरज पवार विश्वस्त डॉ.संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाहू छत्रपती कॅन्सर रिसर्च फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे.रुग्णालयाऐवजी एक आश्रम म्हणून च रुग्णांच्या अखेरच्या प्रवासामध्ये त्यांना सर्व वैद्यकीय मदतीबरोबरच सन्मान,मानसिक आणि आध्यात्मिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.”सांजवात” सारख्या प्रकल्पांची सर्व देशभरात नितांत गरज असून,अशाप्रकारे पहिलाच प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात “कोल्हापूर कॅन्सर सेंटर” कडुन सुरू करण्यात येत आहे.
या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. संजसिंह चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याचे डॉ.संदिप पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे सर्व ट्रस्टी आणि कोल्हापुरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ.रेश्मा पवार यांच्यासह डॉ.योगेश अनप,डॉ.पराग वाटवे आदी उपस्थित होते.