बाळासाहेबांच्या शिवसेनेची सीमा बांधवांना ताकद; बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून रॅलीद्वारे पाठींबा कोल्हापूर : कर्नाटक सरकार गेली ६६ वर्षे सीमाबांधवांवर अन्याय करत आहे. कर्नाटकात होणाऱ्या मराठी बांधवांच्या गळचेपी विरोधात नेहमीच कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनास बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून हजारोंच्या संख्येने दुचाकी रॅलीद्वारे जाहीर पाठींबा देणार असल्याचे …