
गडहिंग्लज:गडहिंग्लजमध्ये श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या विकास निधीतून ४८ लाखांचा फंड व लोकवर्गणीतून हे सुंदर व मनोहर मंदिर साकारले आहे. आतापर्यंत सहाशेहून अधिक मंदिरांच्या बांधकामांसाठी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी एक हजार कोटींहून अधिक निधी दिल्याबद्दल संत श्री. नामदेव महाराज यांचे वंशज श्री. रामदास महाराज यांच्या हस्ते मंत्री श्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला.ग्रामविकास मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, गुरुवर्य श्री. किसन महाराज यांच्या प्रेरणेने साकार झालेल्या या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा मला मोठा आनंद आहे. श्री हनुमान हे दैवत शक्ती आणि स्वामी भक्तीचे प्रतीक आहे. या मंदिरासाठी अजूनही लागेल, तो निधी देऊ.
ते पुढे म्हणाले, गडहिंग्लज शहरातील श्री हनुमान मंदिरासह, श्री.विठ्ठल मंदिर, श्री.जडेयसिद्धेश्वर मंदिर, श्री.लक्ष्मी मंदिर आदी सहा ते सात मंदिरांसाठी सात कोटीहून अधिक निधी देऊ शकलो याची धन्यता वाटते. देव असण्याबद्दल मतमतांतरे आहेत, परंतु माझी अशी श्रद्धा आहे की देवावरील भक्ती आणि श्रद्धेमुळे माणूस ? अनाचारापासून लांब राहतो आणि चांगल्या कर्माला प्राधान्य देतो. गडहिंग्लज ही जिल्ह्याचे प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र आहे.