
कोल्हापूर:पाकिस्तानच्या बाजूने अनुकूल असलेल्या काश्मीरमधील एका वर्गाने हे हल्ले केले. पाकिस्तानबरोबर जायचं नाही अशी भूमिका मांडणाऱ्या मुस्लिमांवरही त्यावेळी हल्ले झाले. भारताबरोबर राहायचं अशी भूमिका मांडणाऱ्या मुस्लिमांवरही हल्ले केले. त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची होती. ते भाजपवाले होते. तेव्हा भाजपने काहीच केलं नाही. उलट तिथल्या हिंदूंना जाण्यास मजबूर केलं. तुम्ही बाहेर जा म्हणून सांगितलं. इतकंच नाही तर त्यांना साधनं दिली. गाड्या दिल्या. त्यांना जायला प्रोत्साहित केलं. हा इतिहास असताना अशी थिअरी मांडणं सत्यावर आधारीत नाही, असा दावाही त्यांनी केला.भाजपमुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे.
ही थिअरी जातीवाद वाढवणारी आहे. द्वेष वाढवणारी आहे. अशी फिल्म निघाल्यावर ती पाहिलीच पाहिजे असं देशाचे प्रमुख बोलायला लागले आणि सत्ताधारी तिकीटं देऊन लोकांना मोफत सिनेमा दाखवायला लागले याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ एकच आहे. सांप्रदायिक विचार पेरून माणसात दुही माजवून त्याचा फायदा घ्यायचा. आता कोल्हापुरात बाय इलेक्शन आहे. त्यात हा सिनेमा नक्की दाखवतील. असल्या सर्व गोष्टींवर त्यांचा भरवसा आहे. त्यांचा कामावर नाही. लोकांचा प्रश्न सोडवण्यावर नाही, जनमाणसात विषारी भावना वाढवण्यावर त्यांचा भर आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.