
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापुरातील इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या आठ वर्षीय विहान विशाल वायचळ याने थायलंड, पटाया येथे झालेल्या इंडो- थाई फोर्थ इंटरनॅशनल स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावत स्केटिंग च्या कॉड प्रकारात दोन गोल्ड मेडल्स पटकावले. कोल्हापुरात कुटुंबीय व मित्र परिवाराने त्याचे जल्लोषी स्वागत केले. विहान हा आठ वर्षाचा असून लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याला स्केटिंगची आवड होती. भारतात तसेच महाराष्ट्रातील अनेक स्पर्धांमध्ये त्याने स्केटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहेत. तेथून त्याला प्रोत्साहन मिळाले. व विहानचा प्रवास सुरू झाला. तसेच मेजर ध्यानचंद सेंट्रल स्पोर्टस कौन्सिलचे सुवर्ण लक्ष अवार्ड त्याला मिळाले असून नॅशनल स्पोर्ट्स प्लेयर म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे. याचबरोबर तनिष्क यादव,नील नार्वेकर, आदीश कोगनोळे,अन्वी मांद्रूपकर या विद्यार्थ्यांनीही गोल्ड मेडल मिळवले आहेत.
सर्वात लहान गटात विहानने केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल आम्हाला खूप त्याचा अभिमान वाटतो असे विहानचे पालक विशाल वायचळ आणि सौ.वेणू वायचळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.विहान कोल्हापूरातील सुप्रसिद्ध टेलर एस.डी. वायचळ यांचे भागीदार कै. विजय वायचळ यांचा नातू आहे. विहानला सुहास कारेकर अकॅडमीचे मार्गदर्शन लाभले.