Home Sports डॉ.अथर्व गोंधळी भारतीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित

डॉ.अथर्व गोंधळी भारतीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित

9 second read
0
0
73
कोल्हापूर :  ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनतर्फे डॉ. अथर्व संदीप गोंधळी यास भारतीय क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पुणे येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी पदमश्री नीलिमा मिश्रा यांच्या हस्ते हा  अथर्वला पुरस्कार प्रदान  करण्यात आला.फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील बेळगावे,उपाध्यक्ष ग्रीष्मा जाधव,सुनीता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी देशातील विविध राज्यामध्ये विविध क्षेत्रात  कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूरमधील नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉक्टर अथर्व संदीप गोंधळी यांने नुकताच यंगेस्ट बर्गमॅन होण्याचा बहुमान मिळविला आहे.डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील बर्गमॅन ११३  या स्पर्धेमध्ये डॉ.अथर्वने स्विमिंग १.९ किलोमीटर, सायकलिंग ९० किलोमीटर रनिंग २१ किलोमीटर अशी सलग नऊ तास असणाऱ्या या स्पर्धेमध्ये  सहभागी होऊन ६ तास ३४ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली होती. या स्पर्धेत देशभरातील ९०० स्पर्धक सहभागी झाले होते.खूप कमी वयात आणि कमी वेळेत अथर्वने ही स्पर्धा पूर्ण केली होती त्यामुळेच डॉक्टर अथर्वला यंगेस्ट बर्गमॅन होण्याचा बहुमान मिळाला  आहे.
टोप संभापुर ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या १४ व्या वर्षी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी बारा तासात २९६ किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून  कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. 
डॉ अथर्व हा लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळवत आला आहे.बालपणापासून ताय क्वांनदो,कुडो,सायकलिंग, ट्रायलिथॉन अशा विविध खेळांमध्ये त्यांने  पारितोषिके पटकावली आहेत.सध्याही तो विविध खेळांमध्ये अग्रेसर आहे.सायकलिंगमध्ये त्याने केलेल्या विश्वविक्रमाची नोंद ही
ग्लोबल रेकॉर्ड, चिर्ल्डन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड,एशिया पॅसिफिक रेकॉर्ड आणि हायरेंज वर्ल्ड रेकॉर्ड आणि कलाम बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड नॅशनल रेकॉर्ड अशा १० जागतिक विक्रमांमध्ये नोंद झाली आहे.याचीच दखल ही  द डायसेस ऑफ एशिया इन इंडिया चेन्नई तामिळनाडू  यांनी घेऊन त्याला डॉकटरेट इन एथलेटिक ही पदवी बहाल केली होती.त्याच्या या यशामुळेच आज त्याला ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनतर्फे  भारतीय क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आणि यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी आपली तयारी महत्वाची असते असे डॉ अथर्वने सांगितले आहे.
Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Sports

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…