
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर जिल्हा हा वैविध्यतने संपन्न असा जिल्हा आहे.शिवाय कोल्हापूर ही कलानगरी शाहू महाराजांची नगरी म्हणून ओळखली जाते या नगरीला कलेचा वारसा लाभलेला आहे करवीर निवासिनी आई अंबाबाई च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीतील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्ताने
पन्हाळा याठिकाणीं निसर्गरम्य वातावरणात धावणे म्हणजे शरीरासाठी शरीराला ऊर्जा देणारे असेच आहे. याच उद्देशाने कोल्हापूरकरांसाठी व देशविदेशातील स्पर्धकांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागटिळक, प्रशांत काटे,उदय पाटील,वैभव बेळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
*मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर असे आहे*
स्पर्धा ही सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. ही मॅरेथॉन २१,११ व ५ किलोमीटर अंतराची असून यातील २१ किलोमीटर स्पर्धा ही सकाळी ६ वाजता फोर्ट इंटरनॅशनल स्कुल पन्हाळा येथून सूरु होणार आहे ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा, लता मंगेशकर,पावनगड, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,तबक उद्यान,बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुन्हा फोर्ट इंटरनॅशनल स्कुल अशी होणार आहे.
तर ११ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन ही फोर्ट इंटरनॅशनल स्कूल येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा फेरी मारून पुन्हा फोर्ट इंटरनॅशनल स्कुल येथे समाप्त होणार आहे.आणि ५ किलोमीटर ची मॅरेथॉन ही फोर्ट इंटरनॅशनल स्कुल,बुधवार पेठ जाऊन फोर्ट इंटरनॅशनल स्कुल अशी असणार आहे.
*मॅरेथॉनचे वयोगट असे आहेत*
या हाप मॅरेथॉन मधील ५ किलोमीटरची मॅरेथॉन ही १३ वर्षांपासून पुढील वय व ११ किलोमीटरची मॅरेथॉन ही १६ वर्षांपासून पुढील वय आणि २१.१किलोमीटरची मॅरेथॉन ही १८ वर्षांपासून पुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे.
*सहभागी सर्व स्पर्धकांना मिळणार किट*
जवळजवळ दोन हजार स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना गुडी बॅग,टी. शर्ट, फीनीशर मेडल,टाईम चिप (११ किलोमीटर व २१.१ किलोमीटर स्पर्धकांसाठी )ई – सर्टिफिकेट नाश्ता आदी दिले जाणार आहे.
*स्पर्धेची नाव नोंदणी येथे करा*
स्पर्धेसाठी नाव नोंदणी ही १ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी ही www.dscorg.in या वेबसाईटवर करावयाची असून आधीक महिरीसाठी संपर्क हा समीर नागटिळे ९९२३६१८०५४,आणि वैभव बेळगावकर – ८२०८१७२४०९ या मोबाईल क्रमांकाशी करायचा आहे.
या स्पर्धेसाठी एकूण ७५ व्हॅालेंटीयर्स मॅरेथॉन मार्गावर कार्यरत असणार आहेत.डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे राजीव लिंग्रस,अभिषेक मोहिते,जयेश कदम,अश्कीन आजरेकर,अमर धामणे,अतुल पोवार,मनीष सूर्यवंशी,संजय चव्हाण,वैभव बेळगावकर,उदय पाटील ,समीर चौगुले आदी पदाधिकारी संयोजन करत आहेत.