
जिल्हा बँकेत राजर्षी शाहू महाराज यांची 148 वी जयंती मोठया उत्साहात साजरी
कोल्हापूर : रविवार दि. 26 कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची 148 वी जयंती बँकेच्या ज्येष्ठ संचालिका माजी खासदार निवेदिता माने यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करुन मोठया उत्साहात साजरी करणेत आली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक जी. एम. शिंदे, आर. जे. पाटील, विकास जगताप, उपव्यवस्थापक सुनिल वरुटे, राजू पाटील, अल्ताफ मुजावर, दिपक चव्हाण, रवी बाबर तसेंच केंद्र कार्यालय व कोल्हापूर शहर
शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.