
मुंबई : विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची स्टार अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन हिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे ऐश्वर्या मोठ्या काळानंतर पुन्हा चित्रपटात झळकणार आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ ती बॉलीवूडपासून लांब होती. आता तिनं प्रख्यात दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या एका चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. 2018 मध्ये ‘फन्ने खां’ रिलीज झाला आणि तेव्हापासून ती मोठ्या पडद्यावर झळकलीच नाही. पण अखेर ती प्रेक्षकांच्या भेटीस परत येतेय.
ऐश्वर्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक होते. आता चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटातून ऐश्वर्या कमबॅक करतेय. चित्रपटाची रिलीज डेटही आलीये आणि सिनेमातील ऐशचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे. तिचा लूक दमदार आहे. भरजरी वस्त्र, अंगावर सुंदर दागिणे, माथ्यावर कुंकू असा तिचा लुक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पोन्नियन सेल्वन’ हा मणिरत्न यांचा एक महत्वाकांक्षी चित्रपट आहे. दोन भागांमध्ये प्रदर्शित होणारा हा सिनेमा कल्कि यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’वर या तामिळ कादंबरीवर आधारित आहे. याचवर्षी 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा बजेट 500 कोटी रूपये आहे. साहजिकच भव्यदिव्य सेट, राजघराण्याचा थाट असं सगळं काही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
काय आहे कथा
पीएस 1 ची कथा ही दहाव्या शतकातील प्रमुख राजवंश चोल साम्राज्याशी संबंधित आहे. राजघराण्यातील संघर्ष, वाद, सत्तांतर यावर यानिमित्तानं पडद्यावर साकारण्यात आली आहे. चित्रपटात ऐश्वर्या रॉय नंदीनीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात तिचा डबल रोल असल्याचं म्हटलं जातेय.तिच्याशिवाय विक्रम, जयम रवि, कीर्ती आणि शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पीएस 1 ही एक पॅन इंडिया चित्रपट असून जो तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.