Home Entertainment पुन्हा एकदा भन्नाट मनोरंजनासाठी ‘बॉईज ३’ सज्ज

पुन्हा एकदा भन्नाट मनोरंजनासाठी ‘बॉईज ३’ सज्ज

0 second read
0
0
14

कोल्हापूर :बॉईज’, ‘बॉईज २’ ला प्रेक्षक व समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचे कथानक व अभिनय सर्वांनाच खूप आवडले होते. ‘बॉईज ३’ चे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बॉईज’ व ‘बॉईज २’ पासूनच धैर्य, ढुंग्या, कबीर यांच्या त्रिकुटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. हा चित्रपट तिघांच्या आयुष्याभोवती फिरत असताना त्यांच्या त्रिकुटात आता विदुलाही सामील झाली आहे. तिच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात काय बदल घडतात, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. त्रिकुट व विदुलासोबतच्या प्रवासाची कहाणी ‘बॉईज ३’ मध्ये बघायला मिळणार आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड व विदुला चौगुले यांचा उत्कृष्ट अभिनय असलेला हा चित्रपट १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

चित्रपटातील ‘लग्नाळू २.०’ गाण्याने प्रेक्षकांमध्ये भलतीच क्रेझ निर्माण केली आहे. सर्वांना नाचायला भाग पडणाऱ्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत असून मुग्धा कऱ्हाडेचा कमाल आवाज लाभला आहे. ‘लग्नाळू’ गाण्याप्रमाणेच ‘लग्नाळू २.०’ गाणेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्यासोबत विदुलाने जबरदस्त ठेका धरला आहे. राहुल ठोंबरे व संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, ” ‘बॉईज ३’ च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. ही उत्सुकता पाहुन मला खूप आनंद होत आहे. ‘बॉईज ३’ च्या संपूर्ण टीमने भरपूर मेहनत घेतली आहे. कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम बजावल्या आहेत. ‘बॉईज’ व ‘बॉईज २’ च्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर ‘बॉईज ३’ प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.”

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शनअंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १६ सप्टेंबरला ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Entertainment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…