
कसबा सांगाव:बिळात लपलेले विरोधक सत्ता संघर्षानंतर बाहेर पडलेत. त्यांना माझं विधायक काम पटले आहे. त्यामुळेच, मी सुरू केलेल्या योजना ते राबवित आहेत, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. गोरगरिबांच्या कल्याणाच्या या योजना कोणीही राबवीत असले, तरी त्यावर शिक्का मात्र माझाच आहे, असेही ते म्हणाले.
कसबा सांगाव ता. कागल येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य आणि अत्यावश्यक साहित्य संचाच्या वाटप कार्यक्रमात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गोरगरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवूनच जनतेच्या विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या. सत्तेच्या प्रत्येक संधीत गोरगरिबांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आई आणि वडील अशा दोघांनाही एकत्र पेन्शन योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. कसबा सांगाव मध्ये तब्बल ३० कोटींची विकासखामे पूर्ण झाली असल्याचेही ते म्हणाले.