
कोल्हापूर: आकाश बाजूच्या वतीनेविद्यार्थ्यांना, विशेषत: मुलींना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आणि एक मुलगी किंवा एकल पालक (आई) असलेल्या कुटुंबांना लाभ देण्यासाठी पुढाकार घेत आहे. यासाठीच प्रकल्पानुसार, सर्व मान्यता प्राप्त विद्यार्थी आकाश बायजू’ज संस्थेची प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षा, नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – 2022 (एएनटीएचई 2022), 5 ते 13 नोव्हेंबर 2022 दरम्यान देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे होणारी परीक्षा या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे.एज्युकेशन फॉर ऑल’ उपक्रमाच्या शिष्यवृत्ती नियमित नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम शिष्यवृत्ती व्यतिरिक्त आहेत. पूर्वीप्रमाणेच, (एएनटीएचई 2022), 13वी आवृत्ती, गुणवंत विद्यार्थ्यांना 100% पर्यंत शिष्यवृत्ती तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना रोख पारितोषिके प्रदान करेल.
शिष्यवृत्ती व्यतिरिक्त, 5 विद्यार्थी पालकांसह एनएएसए ची मोफत सहल देखील जिंकतील.अधिक माहितीसाठी, anthe.aakash.ac.in वर लॉग इन करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. सांगली विभाग प्रमुख दिनेश रमगिरीवर, प्रभाकरअमलकांती, कोल्हापूर विभाग प्रमुख प्रवीण गायकवाड,वरून सोनी यांनी पत्रकार परिषदेत एज्युकेशन फॉर ऑल चे लॉन्चिंग केले.
प्रकल्पानुसार, सर्व मान्यता प्राप्त विद्यार्थी आकाश बायजू’ज संस्थेची प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षा नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – 2022 (एएनटीएचई 2022, 5-13 नोव्हेंबर, 2022 दरम्यान देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने होणार आहेत. सर्वोच्च 2,000 विद्यार्थ्यांना आकाश बायजू’ज च्या (एनईईटी) आणि आयआयटी-जेईई कोचिंग प्रोग्राम्ससाठी विशेष बाबींवर आधारित मोफत कोचिंग दिले जाईल.
लाभार्थी विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी, आकाश निवडक एनजीओ सोबत भागीदारी करेल, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, फक्त मुलगी आणि एकल पालक (आई) विद्यार्थ्यांना नामनिर्देशित करू शकतात. आकाश बायजू’ज चे पॅन इंडिया नेटवर्क आहे ज्यामध्ये जवळपास 285+ केंद्रे आहेत, जी देशातील कोणत्याही कोचिंग संस्थेसाठी सर्वाधिक आहे. प्रत्येक केंद्रात सरासरी 9 वर्ग चालवले जातात. लाखो विद्यार्थी आहेत ज्यांना खाजगी कोचिंग परवडत नाही जे त्यांची प्रवेश परीक्षेत अपयशी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात. परवडण्याच्या समस्येला जोडणारा मुद्दा म्हणजे लिंग असमानता, जिथे कुटुंबे एका विशिष्ट इयत्तेपेक्षा मुलींच्या शिक्षणावर जास्त खर्च करण्यासाठी पुढे येत नाहीत. या संदर्भांमुळे वंचित समाजातील विद्यार्थ्यांचे आणि सर्वसाधारणपणे मुलींचे मनोधैर्य कमी होते. ‘एज्युकेशन फॉर ऑल’ च्या माध्यमातून आम्ही या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कोचिंगच्या संधींचा विस्तार आणि व्याप्ती वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न करत आहोत.”लाभार्थी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कोचिंगच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.