Home Entertainment गाथा नावनाथांची मालिकेतील कलाकार व जाधव यांच्याकडून शिवराय तरुण मंडळाची महाआरती संपन्न

गाथा नावनाथांची मालिकेतील कलाकार व जाधव यांच्याकडून शिवराय तरुण मंडळाची महाआरती संपन्न

0 second read
0
0
16

गाथा नावनाथांची मालिकेतील कलाकार व जाधव यांच्याकडून शिवराय तरुण मंडळाची महाआरती संपन्न

कोल्हापूर : शाहूपुरी घोरपडे गल्ली येथील शिवराय तरुण मंडळाच्यावतीने बुधवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती. तर लोकांच्यात उत्सुकता व लोकप्रिय असणारी सोनी मराठी वरील ‘गाथा नवनाथाची’ या लोकप्रिय मालिकेतील जयेश शेवलकर आणि नकुल घाणेकर या कलाकारांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. गाथा नावनाथांची मालिकेबाबत त्यांनी माध्यमांशी व लोकांशी संवाद साधला. यानंतर आयोजित महाप्रसादाचा शुभारंभ ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष यांनी पाहुण्यांना मानाचा गणपती असणाऱ्या श्रींचे मानाचे श्रीफळ व रोप देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडी, भागाचे नगरसेवक दिलीप पोवार, रत्नेश शिरोलकर, राम झेंडे, अमित हुक्कीरे, प्रसारमाध्यमातील सर्व माध्यमकर्मी व मंडळाचे अध्यक्ष अमेय बकरे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Entertainment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…