
रमाई आवास योजनेच्या घरकुलधारकांकडून आमदार हषनसाहेब मुश्रीफ यांचा सत्कार
आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्नानेच जुनी, पडकी -सडकी कौलारू घरे जाऊन पक्की मजबूत घरे मिळाल्याची भावना……..
कागल : येथील रमाई आवास योजनेच्या घरकुलधारकांकडून आमदार हसनसाहेब यांचा कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी आमदार श्री. मुश्रीफ यांच्या घरी भेटून हा सत्कार केला. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्नानेच जुनी, पडकी -सडकी, कौलारू घरे जाऊन पक्की मजबूत घरे मिळाल्याची भावना या रहिवाशांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, अठरापगड जातीचा बहुजन समाज माझे कुटुंब बनला आहे. त्यांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठीच संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार आहे.
सतीश कांबळे म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी गेली वीस वर्षे रमाई आवास योजना शहरात राबविली आहे. त्यामुळेच झोपडपट्ट्या, पडकी, कौलारू जीर्ण झालेली घरे जाऊन आज आम्ही आरसीसी घरात राहत आहोत. एखाद्या उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतीला लाजवेल, असे आमचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर बनले आहे. याचे श्रेय कोणी ऐरा- गैरा घेत असेल तर हे चालू देणार नाही.
श्रीमती भारती कांबळे म्हणाल्या, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनीच गोरगरिबांचा उद्धार केला आहे. त्यामुळेच आमची पडकी -सडकी घरे जाऊन मजबूत घरे आम्हाला मिळालेली आहेत. कोणीतरी मी केलं, मी केलं असं थातूरमातूर सांगत असेल तर हे चालणार नाही. आमदार श्री. मुश्रीफसाहेब हेच गरिबांचा आधार आहेत आणि त्यांचा आधार आम्हाला सदैव लाभावा एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. यावेळी माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, नगरसेवक विवेक लोटे, भगवान कांबळे, सुरेश कांबळे, गणेश कांबळे, दीपक कांबळे, सुरज कामत, बच्चन कांबळे, तुषार भास्कर, दीपक कांबळे, राहुल कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.