
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची आपली कन्या स्वरूपीनी गजेंद्र लक्ष्मीच्या रूपात पूजा केली आहे.
महर्षी दुर्वासांना जगदंबे न प्रसाद रूप अशी पुष्पमाला दिली. हा प्रसाद एखाद्या वैभवशाली आणि अधिकारी व्यक्तीकडे असावा म्हणून त्यांनी ती पुष्प माला ऐरावतावरून चाललेल्या इंद्राकडे दिली. इंद्राने तो पुष्पहार आपला हत्ती ऐरावत याच्या गळ्यात घातली. रागावलेल्या ऋषींनी इंद्राला शाप दिला ज्या वैभवाच्या मदाने ते देवीप्रसादाचा अपमान केलास. ती त्रिभुवनाची सगळी लक्ष्मी क्षीरसमुद्रात बुडून जाऊ दे. दुर्वासांच्या शापानुसार सर्व देव श्री विहीन झाले ऋषींचा शाप सर्व देवांना प्रभावित करणारा असल्याने नारायणाची पत्नी आणि सर्वस्याद्या महालक्ष्मीची कन्या असणारी कमला लक्ष्मी सुद्धा क्षीरसमुद्रामध्ये विलीन झाली. तेव्हा भगवान नारायणाच्या सल्ल्याप्रमाणे देवांनी त्यांच्या मदतीने सागर मंथन करायचे ठरवले मंदार पर्वताची रवी, वासुकी नागाची दोरी करून समुद्र घुसळायला सुरुवात केली एकापाठोपाठ एक बाहेर येणाऱ्या रत्नांना त्यांची त्यांची मूळ जागा प्राप्त होऊ लागली अशातच हिरण्यवर्णा म्हणजे सुवर्णकांतीची चतुर्भुजा लक्ष्मी प्रगट झाली तिच्या हातामध्ये कुंभ कमळ वरद मुद्रा कमलासनावर विराजमान अशी सालंकृत लक्ष्मी पाहून आठ दिशांना तोलून धरणाऱ्या ऐरावत पुंडलिक वामन कुमुद प्रति अशा आठ दिग्गजांनी म्हणजे आठ हत्तींनी तिच्यावर सोंडेत अमृतकलश घेऊन अभिषेक केला म्हणून लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये तिला अभिषेक करून अभिवादन करणाऱ्या प्रतिक रूप अशा हत्तींचे चित्रण केले जाते आज करवीर निवासिनी आपल्या याच लाडक्या लेकीच्या रूपात सजली आहे.