
जॉयंटसच्या शायना एन.सी. 29 ऑक्टोबरला कोल्हापुरात
कोल्हापूर : सर्वसामान्य व्यक्तीच्या सहभागातून विविध प्रकारचे सामाजिक काम करणाऱ्या जॉयंट्स ग्रुप च्या मार्गदर्शक आणि जॉयंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या विश्वाध्यक्षा आणि भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी. या 29 ऑक्टोबरला कोल्हापुरात येत आहेत. त्या जिल्ह्यातील जॉयंटसचे सर्व ग्रुपशी संवाद साधून जॉयंटस फेडरेशनच्या विविध उपक्रमांना त्या हजेरी लावणार आहेत.
भाजपच्या प्रवक्त्या आणि जॉयंटस वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा शायना एन.सी. यांचे कोल्हापुरातील हॉटेल रेडियंटमध्ये दुपारी साडेबारा वाजता स्वागत होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, आष्टा, इस्लामपूर, भिलवडी या परिसरातील जॉयंटसच्या सर्व ग्रुपना त्या सदिच्छा भेट देणार आहेत. ‘जॉयंटस ग्रुपची वाटचाल’ याबाबत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जॉयंटसच्या पदाधिकाऱ्यांना त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे जॉयंटस फेडरेशनच्या सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमाला त्या उपस्थिती लावणार आहेत. सहेली सिंफोजीएम या कार्यक्रमांमध्ये जॉयंटसच्या सर्व महिला सदस्या सहभागी होऊन विविध कला गुण सादर करणार आहेत. इस्लामपूर मध्ये सर्जेराव यादव सांस्कृतिक हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचे माजी अध्यक्ष. डॉ. राजकुमार पोळ यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मंगला कुलकर्णी, प्रमोद शहा, रामदास रेवणक,र माजी अध्यक्ष शिवाजीराव यादव उपस्थित होते.