
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील पहिली इन्क्युबेटेड सह स्टार्टअप इको सिस्टीम असणारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ(MSBTE) संलग्नित व्यवसायाभिमुख पदविका संस्थेस कोल्हापूरमध्ये प्रथमच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून प्रवेशाकरिता महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे अशी माहिती संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी दिली आहे.सिद्धम इनोव्हेशन व बिझनेस इन्क्युबेशन सेंटर संचलित सिबीक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर ही महाराष्ट्र राज्यतंत्रशिक्षण मंडळ मुंबई संलग्नित व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ६ महिन्यांच्या इंटर्नशिपसह १ वर्षांच्या कालावधीचे १२ वी पास विद्यार्थ्यांकरिता डिप्लोमा इन सप्लायचेन मॅनेजमेंट व लॉजिस्टिक तसेच १२ वी, आयटीआय, डिप्लोमा इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांकरीता डिप्लोमा इन मेडिकल इक्विपमेंट मेंटेनन्स व ॲडव्हान्सड डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्स तसेच बी.एस.सी, बी.फार्म, बी.ए, एम. एस,बी.एच.एम. एस, विद्यार्थ्यांकरिता आरोग्य विभागाशी निगडित ॲडव्हान्सड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हे व्यवसायाभिमुख प्रत्येकी ६० जागेसह वार्षिक फी रुपये २५ हजार ते ३० हजार प्रमाणे प्रथमच उपलब्ध झाले आहेत.