Home Entertainment गावपळणीची अनोखी प्रथा असणारा ” प्रेम प्रथा धुमशान” 4 नोव्हेंबरला प्रदर्शित

गावपळणीची अनोखी प्रथा असणारा ” प्रेम प्रथा धुमशान” 4 नोव्हेंबरला प्रदर्शित

0 second read
0
0
20

कोल्हापूर : सिंधुदुर्गातली गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित “प्रेम प्रथा धुमशान” या चित्रपटातून गावपळणीची प्रथा पहिल्यांदाच दिसणार असून, ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे.

ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजीत वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजीत मोहन वारंग यांच्या पिकासो या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला ‘देजावू’ हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते प्रेम प्रथा धुमशान’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खड़पकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातलं “धुमशान घाला रे” हे मालवणी गाणं सध्या सगळीकडे वाजत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावपळण ही अनोखी प्रथा पाळली जाते. गावपळण प्रथा पाळणाऱ्या गावातील ग्रामस्थ एका ठरावीक काळासाठी गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. या प्रथेबाबत अनेक वंदता आहेत. मात्र आजही ही प्रथा पाळली जाते. या प्रथेबरोबरच एक प्रेमकथा गुंफून प्रेमप्रथा धुमशान हा चित्रपट तयार झाला आहे. मात्र या प्रेमकथेला विरोधाची किनार आहे. या प्रेमकथेत संघर्ष, विरोध आहे, श्रद्धा-अंधश्रद्धेचा झगडा असं सारं काही असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. गावपळण या प्रथेविषयीच मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रथेची पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा हा बोनस ठरणार आहे. त्यामुळेच अस्सल मालवणी भाषेतला, लोकसंस्कृतीवर आधारित “प्रेम प्रथा धुमशान” नक्कीच बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमशान घालणार यात शंका नाही.

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In Entertainment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…